संपूर्ण महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या परश्या आणि आर्चीची एक झलक पाहण्यासाठी ‘सैराट’ झालेल्या गर्दीमुळे येथे रविवारी सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमात काहीशी चेंगराचेंगरी झाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

येथील धन्वंतरी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातर्फे गंगापूर रस्त्यावरील चोपडा बँक्वेट सभागृहात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ‘सैराट’चा नायक आकाश ठोसर व नायिका िरकू राजगुरू ही जोडी मुख्य आकर्षण होती. फॅशन शो दरम्यान ही जोडी ‘रॅम्प वॉक’ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यामुळे परश्या आणि आर्चीची ही नवीन अदा पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी चिक्कार गर्दी जमली होती. सभागृहात प्रवेशिका पाहून प्रवेश देण्यात येत होता. परंतु, जागा कमी आणि प्रवेशिका जास्त, अशी स्थिती झाल्यामुळे सभागृह अल्पावधीतच तुडुंब भरले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा फॅशन शो सुरू झाला. परंतु, सैराटची जोडी काही दिसेना. अखेर साडेआठच्या सुमारास परश्या आणि आर्चीचे आगमन झाले आणि गर्दी अक्षरश: झिंगाट झाली. सभागृहाबाहेर प्रवेशिका असूनही सुरक्षारक्षक आतमध्ये सोडत नसल्याने गर्दीने दरवाजाला धडका देण्यास सुरुवात केली. दरवाजा तुटण्याच्या स्थितीत आल्यावर एक बाजू मोकळी झाल्याने सर्व गर्दी आतमध्ये धावली. त्यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन काही जण पडले. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप