आजवर कलाविश्वातील अनेक अभिनेत्री त्यांच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असतात. मात्र या अभिनेत्रींमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जी वयाच्या ५० व्या वर्षीही प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. अभिनेता आमिर खानच्या ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री पूजा बेदी साऱ्यांच्याच लक्षात असेल. आज पूजाचा वाढदिवस असून पूजा ५० वर्षांची आहे. मात्र तिच्याकडे पाहिल्यावर कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही.
‘जो जिता वहीं सिकंदर’ या चित्रपटातून पूजाला विशेष प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहिली. विशेष म्हणजे पूजा बऱ्याच वेळा तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त कारणांमुळेच चर्चेत राहिली. यात पूजाची पर्सनल लाईफ हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. पूजाने आतापर्यंत पाच जणांना डेट केल्याचं म्हटलं जातं.
दरम्यान, सतत चर्चेत राहणारी ही अभिनेत्री वयाच्या ५० व्या वर्षीदेखील सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे अनेक वेळा तिला टीकेचं धनीदेखील व्हावं लागलं आहे. पूजाने वयाच्या ४८ व्या वर्षी व्यावसायिक मानेक कॉन्ट्रॅक्टरशी लग्न केलं असून सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजाने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. मानेक हा पूजाचा शाळेतील मित्र असून तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 1:24 pm