31 October 2020

News Flash

“टाळ्या-थाळ्या सोडून दुसरं काहीतरी सांगा”; अभिनेत्रीची मोदींवर टीका

सरकारच्या वैद्यकिय योजनांवर अभिनेत्रीने उपस्थित केले प्रश्न

संग्रहित छायाचित्र

देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वातावरण गंभीर झालेलं आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढे करोनाचा सामना कसा करायचा? याबाबत आज रात्री आठ वाजता देशवासीयांना मार्गदर्शन करणार आहेत. मोदींच्या या सूचनेवर अभिनेत्री पूजा बेदी हिने टीका केली आहे.

काय म्हणाली पूजा बेदी?

“आज रात्री आठ वाजता पंतप्रधान आपलं मार्गदर्शन करणार आहेत. मला आशा आहे, की यावेळी तरी ते टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या हे सोडून काहीतरी दुसरं सांगतील. लॉकडाउन प्रोटोकॉल, देशाची आर्थिक स्थिती, वैद्यकीय उपचार अशा विषयांना ते स्पर्श करतील, अशी अपेक्षा आहे.” अशा आशयाचे उपरोधिक ट्विट पूजा बेदी हिने केले आहे.

सिनेसृष्टीपासून दूर असलेली पूजा बेदी गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती आपली मते रोखठोकपणे मांडताना दिसत आहे. दरम्यान तिने अनेकदा अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर पूजाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 2:21 pm

Web Title: pooja bedi criticise pm narendra modi mppg 94
टॅग Coronavirus
Next Stories
1 गुरूला धडा शिकवून शनाया आणि राधिका उभारणार विजयाची गुढी
2 Coronavirus : ‘आमचे शेजारी करोनाग्रस्त’; अभिनेत्यानेच पसरवली अफवा, त्यानंतर…
3 ‘पनौती हटी’; शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांचे तंबू हटवल्यानंतर निर्मात्याचे ट्विट
Just Now!
X