बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजूपतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. त्यानंतर स्टार किड्स आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते यांच्यावर सुशांतच्या चाहत्यांनी निशाणा साधला. खास करुन महेश भट्ट यांच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यात आले. अशातच संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला महेश भट्ट यांच्या ‘सडक २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच यूट्यूबवर २४ तासात सर्वाधिक डिसलाइक मिळालेला ट्रेलर ठरला. आता पूजा भट्टने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘प्रेम करणारे आणि राग करणारे लोकं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही दोघांनीही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि चित्रपट टॉप ट्रेंडमध्ये असल्याची खात्री करुन दिली त्याबद्दल तुमचे आभार’ असे पूजा भट्टने ट्विटमध्ये म्हटले आहे.

पूजाच्या या ट्विटवर सोनी राजदन यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ‘अतिशय हुशार मुलगी आणि तू सांगितलेलं सत्य आहे’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. या चित्रपटाच्या तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रत्येक भूमिकांची ओळख करण्यात आली असून कथेची झलक पाहायला मिळते. हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.