बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे कायम चर्चेत असणारी पूनम पांडे सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कोणत्याही बोल्ड फोटोमुळे नव्हे तर तिच्या प्रेग्नंसीविषयी चर्चा रंगल्या आहेत. २ महिन्यांपूर्वी सॅम बॉम्बेसोबत लग्न करणारी पूनम प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या प्रेग्नन्सीच्या चर्चांबाबत पूनम पांडेने मौन सोडलं आहे.
कित्येक वर्ष सॅम बॉम्बेसोबत रिलेशनशीपमध्ये असलेल्या पूनमने १ सप्टेंबर २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. त्यानंतर पूनम प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, या चर्चांना पूनमने पूर्णविराम दिला आहे. मी गरोदर असेन तर स्वत: त्याविषयी सांगेन असं ती म्हणाली आहे.
“मी गरोदर असल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मात्र, जर या चर्चांमध्ये काही सत्य असेल तर ते मी स्वत: सगळ्या जगाला सांगेन”, असं पूनम म्हणाली.
आणखी वाचा- पूनम पांडेच नव्हे तर ‘हे’ कलाकारही वादाच्या भोवऱ्यात; केला आक्षेपार्ह व्हिडीओ शूट
दरम्यान, अलिकडेच पूनमने गोव्यात सरकारी जागेवर एक आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर तिच्या आणि पतीविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर न्यायलयाच्या परवानगीनंतर पूनम १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत परतली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 9:36 am