‘कॉन्ट्रव्हर्सी गर्ल’ पूनम पांडे लवकरच ‘द वीकएंड’ चित्रपटात दिसेल. २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठीची एक पत्रकार परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात आपण कॉन्ट्रव्हर्सी का करत होतो याचे गुपित तिने या पत्रकार परिषदेदरम्यान उघड केले. सुरुवातीला सतत प्रकाशझोतात राहणे गरजेचे असल्याने मी काही ना काही कॉन्ट्रव्हर्सी करत असे, अशी कबुली तिने यावेळी दिली.

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने हिंदीबरोबरच तेलगू चित्रपटांमधूनदेखील भूमिका साकारल्या आहेत. पूनमने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. ‘ग्लॅडरेग्स मॅनहंट’ आणि ‘मेगामॉडेल हंट २०१०’च्या टॉप नऊ स्पर्धकांमध्ये पूनम होती. फॅशन मासिकाच्या मुखपृष्ठावरदेखील ती झळकली होती. २०११ मध्ये तिने २९ कॅलेंण्डर्ससाठी शूट केले होते. नंतर २०१२ मध्ये तिला किंगफीशर कॅलेण्डरचा हिस्सा बनण्याची संधी मिळाली.

पहिल्यांदा २०११ मध्ये ती चर्चेत आली. टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यास आपण स्ट्रिप करू असे धक्कादायक विधान तिने केले होते. पूनमचे हे विधान हवा निर्माण करण्यापुरतेच राहिले. लोकांच्या नाराजीमुळे तिने हे पाऊल उचलले नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, बीसीसीआयने परवानगी न दिल्यामुळे आपण हा निर्णय मागे घेतल्याचा खुलासा नंतर पूनमकडून करण्यात आला. २०१२ मध्ये जेव्हा ‘कोलकाता नाइट रायडर्स’नी ‘आयपीएल-५’ जिंकले तेव्हा पूनमने विवस्त्र पोझ दिली होती.

२०१३ मध्ये तिला ‘नशा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. चित्रपटात तिने एका शिक्षिकेची व्यक्तीरेखा साकारली होती, जी आपल्या विद्यार्थ्याबरोबर सेक्सुअल रिलेशनशिपमध्ये पडते. या चित्रपटाचा पोस्टरदेखील खूप बोल्ड होता. ज्यावर लोकांनी आपत्ती दर्शवली होती. चित्रपटाविरुध्द निदर्शने करत लोकांनी पोस्टर्स जाळली होती. या चित्रपटाचा सिक्वल पूनमने साइन केल्याची चर्चा आहे. ‘लव इज पॉयझन’ नावाच्या कन्नड शॉर्टफिल्ममध्येदेखील तिने अभिनय केला आहे.

A Pic for you !!💋

A photo posted by Poonam Pandey (@ipoonampandey) on

Shooting in Bali for #webtvasia #asiahotangles 💋

A photo posted by Poonam Pandey (@ipoonampandey) on

व्हिडिओ