शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेली पॉपस्टार रिहाना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रिहानाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. हिंदू देवतांचा अपमान केल्यानं रिहाना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

रिहानाने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केला असून तिने गळ्यात फक्त एक मोत्यांचा हार आणि एक चेन घातली आहे. यात श्री गणेशाचं पेंडेंट आहे. फॅशनच्या नावाखाली रिहाना हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याची टीका ट्रोलर्सनी केली आहे.


रिहानाच्या या फोटोवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हंटल आहे ” सनातन धर्म हा खूपच सहिष्णू असून याचा गैरफायदा आता अनेक जण घेत आहेत. सिनेसृष्टीतील मंडळी किंवा जाहिरात कंपन्या मनमानी करत हिंदू देवतांचा अपमान करत आहेत. इतर धर्माचा अपमान झाल्यास संपूर्ण जगात खळबळ माजते. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका”अशी तीव्र प्रतिक्रिया गिरिराज सिंह यांनी केली आहे.

(photo credit- twitter)

अनेक नेटकऱ्यांनीदेखील रिहानाच्या फोटाला ट्रोल केलंय. ‘रिहाना तू आम्हाला निराश केलंस’ , हिंदू धर्म म्हणजे काही सौदर्याचं साधनं नाही” असं म्हणत ट्रोलर्सनी रिहानावर निशाणा साधलाय.

शेतकरी आंदोलनापासून रिहाना भारतमध्ये चर्चेत आली आहे. शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणारं ट्वीट रिहानाने केलं होत. या ट्वीटवरुन बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी रिहानाला धारेवर धरलं होतं. या आधी देखील वादग्रस्त फोटोशूटमुळे रिहाना चर्चेत आली आहे. मात्र शेतकरी आंदोलन आणि आता गणपतीचं पेंडेंट घालून केलेल्या फोटोशूटमुळे रिहाना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.