News Flash

अखेर ‘बाहुबली’ प्रभास परतला…

या फोटोमध्ये तो बराच बारीक झालेला दिसतोय

अभिनेता प्रभास

‘बाहुबली २’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासने एक महिन्याचा मोठा ब्रेक घेण्याचे ठरवले होते. यासाठी त्याने थेट अमेरिका गाठली होती. अमेरिकेत नक्की कुठे प्रभास सुट्ट्यांचा आनंद घेत आहे याचा थांगपत्ताही त्याने शेवटपर्यंत लागू दिला नाही. एक महिन्याच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेऊन अखेर तो भारतात परतला आहे. जुलै महिन्यात तो त्याचा आगामी सिनेमा ‘साहो’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार.

अरुंधती रॉयला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर ते मलाही आहे- परेश रावल

सध्या त्याचा भारतात परतल्या नंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो बराच बारीक झालेला दिसतोय. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हाकीम याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रभाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. प्रभासने अलीमकडून एक खास हेअर स्टाइल करून घेतली आहे. प्रभास, अमरेंद्र बाहुबलीसारखा भारदस्त जरी दिसत नसला तरी तो आजही अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत आहे.

३७ वर्षीय प्रभासच्या ‘साहो’ या आगामी सिनेमाचा टीझर बाहुबली सिनेमादरम्यान दाखवण्यात आला होता. सुजीथ दिग्दर्शित सिनेमाचा टीझर बघून या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन असल्याचे दिसून येते. हिंदी, तामीळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमातील अ‍ॅक्शन सीनवर प्रचंड खर्च केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रभासच्या या सिनेमाकडे सगळ्यांच्याच नजरा असून, प्रभासचा करिष्मा या सिनेमात पुन्हा एकदा पाहायला मिळणार की नाही याची त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2017 8:04 pm

Web Title: prabhas back from us looks slimmer than baahubali avatar new hair
Next Stories
1 MOM Movie Trailer: देव सगळीकडे नसतो म्हणून त्याने ‘आई’ बनवली
2 सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘मांजा’चा टिझर प्रदर्शित
3 मृत्यूच्या खोट्या बातमीवर शाहरुख म्हणतो…
Just Now!
X