तामिळ सुपरस्टार प्रभासचा आगामी ‘साहो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येकालाच उत्सुकता लागी आहे. या चित्रपटामध्ये प्रभास कोणत्या रुपात झळकणार याचीच सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. त्यातच आता प्रभासने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढविली आहे. प्रभासने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत ‘साहो’संदर्भात तो लवकरच एक गुडन्यूज देणार असल्याचं म्हटलं आहे.

“हॅलो मित्रांनो, लवकरच तुम्हाला एक सरप्राइज देणार आहे. उद्या (मंगळवारी) हे सरप्राइज तुम्हाला मिळेल, असं प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच त्याने #SaahoSurprise हा हॅशटॅग वापरला आहे. तसंच त्याने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे”.

 

View this post on Instagram

 

Hello darlings… A surprise coming your way, tomorrow. Stay tuned… #SaahoSurprise

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

‘साहो’ हा चित्रपट तेलुगु आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रभास आणि तिच्या व्यतिरिक्त अरुण विजय आणि नील नितीन मुकेश यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजीत करणार आहेत.