News Flash

‘कबीर सिंग’च्या टीझरवर ‘बाहुबली’ फिदा

या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन संदीप वांगा करत आहेत.

prabhas
प्रभास

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता शाहिद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंग’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट तुफान गाजला होता. त्यामुळे हिंदी रिमेकची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या टीझरमधील शाहिद कपूरचा लूक हुबेहूब अर्जुन रेड्डीसारखाच असल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळाले आहे.

‘कबीर सिंग’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील शाहिदला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामधील एक म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रभास. सध्या प्रभास ‘साहो’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैद्राबादला रवाना झाला आहे. त्यादरम्यान प्रभासने ‘कबीर सिंग’चा टीझर पाहिला. चित्रपटातील शाहिद कपूरची भन्नाट भूमिका पाहताच प्रभासने त्याला फोन केला असल्याचे सेलिब्रिटी स्टाइलिस्ट आलिम हाकिनने एका मुलाखतीमध्ये सांगितले. ‘साहो’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलिम प्रभास सह होता.

‘कबीर सिंग’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच प्रभासने शाहिदला फोन केला. त्या दोघांचे फोनवर सात मिनिटे संभाषण सुरू होते. तसेच प्रत्यक्षातील कबीर सिंगपेक्षाही चांगला कबीर सिंग चित्रपटात पाहायला मिळाला आहे असे देखील प्रभास म्हणाला असल्याचे आलिमने सांगितले.

‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. आता या हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 4:46 pm

Web Title: prabhas reacted after seeing the teaser of shahid kapoor kabir singh movie
Next Stories
1 राजकारणात उतरण्याचे सारा अली खानकडून संकेत
2 ‘H2O’च्या कलाकारांचे पडद्यामागील श्रमदान
3 ‘स्टुडंट ऑफ द इअर २’चा ट्रेलर पाहून वरूण म्हणतो…
Just Now!
X