अभिनेत्री प्राची देसाई ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्राचीने २००६ मध्ये ‘कसम से’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने २००८मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकत्याच एका मुलाखतीत प्राचीने कास्टिंग काउचचा तिला आलेला एक भयानक अनुभव सांगितला आहे.

‘बॉलिवूड बबल’ने दिलेल्या वृत्तानुसार, ” मला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती, त्यासाठी दिग्दर्शकाने मला कॉम्प्रोमाईज करायला सांगितले होते. मी नकार दिला त्यानंतर दिग्दर्शकाने मला फोन केला आणि पुन्हा या बद्दल बोलला. मी त्याला सांगितले मला तुझा चित्रपट करायचा नाही,” असे प्राची म्हणाली. प्राची आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असली तरी सुद्धा तिला करीअरच्या सुरूवातीला कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Desai (@prachidesai)

फक्त प्राची नाही तर आता पर्यंत अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव उघडपणे सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अकिंता लोखंडेनेही तिला आलेले कास्टिंग काउचचे दोन अनुभव सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Desai (@prachidesai)

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सायलेंस : कॅन यू हियर इट’ या चित्रपटात ती पोलिसाच्या भूमिकेत दिसली होती. या आधी प्राचीने ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’, ‘अजहर’, ‘लाइफ पार्टनर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.