News Flash

प्रकाश राज यांनी वयाने १२ वर्ष लहान कोरिओग्राफरशी केलंय लग्न

दोन्ही मुलींची परवागनी घेऊनच त्यांनी दुसरं लग्न केलं.

प्रकाश राज

अनेकदा खलनायकी भूमिका साकारूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते प्रकाश राज यांचा ५५ वा वाढदिवस. बॉलिवूडचे जयकांत शिक्रे अर्थात प्रकाश राज त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या विविध भाषांमधील चित्रपटांत काम केले आहे. आपल्या मतांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊयात..

बेंगळुरूच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना दोन मुली आहेत. १९९४ साली ललिता यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर प्रकाश राज यांनी त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्नगाठ बांधली. आपल्या दोन्ही मुलींची परवागनी घेऊनच त्यांनी पोनीशी लग्न केलं.

आणखी वाचा : शेवंता झाली शेफ; पाहा घरी बसून काय करतेय?

एका मुलाखतीत प्रकाश राज यांनी सांगितलं होतं की, “पोनी माझ्या एका चित्रपटासाठी कोरिओग्राफी करत होती. मी माझ्या आई व मुलींना तिच्याविषयी सांगितलं. तिच्याशी लग्न करायची इच्छा त्यांना बोलून दाखवली. लग्नापूर्वी पोनी आणि माझ्या मुलींची भेट घालून दिली. मुलींची परवानगी घेतल्यानंतर मी पोनीच्या वडिलांची भेट घेतली आणि तिला लग्नाची मागणी घातली.”

‘वॉटेंड’, ‘सिंघम’, ‘दबंग’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रकाश राज यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 11:56 am

Web Title: prakash raj marriage story his career and personal life ssv 92
Next Stories
1 ‘घरचं सामान घेऊन जाणाऱ्यालाही मारणं योग्य आहे का?’; दिग्दर्शकाचा संतप्त सवाल
2 शेवंता झाली शेफ; पाहा घरी बसून काय करतेय?
3 Coronavirus : ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’; सोनू निगम संतापला