News Flash

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘चंद्रमुखी’चा टीझर प्रदर्शित!

५ नोव्हेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नुकताच ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चंद्रमुखीचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर चर्चेत असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक करत आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने “आनंद होतोय जाहीर करताना नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला, ‘चंद्रमुखी’ येणार तुमच्या भेटीला मंगलमयी ‘दिवाळी पाडव्याला'” असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prasad Oak (@oakprasad)

चंद्रमुखी हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली असून अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने सांगीत दिले आहे. तसेच या चित्रपटाची, पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. पण चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे अद्यप स्पष्ट झालेले नाही. चित्रपट दिवाळीत ५ नोव्हेंबर २०२१मध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 5:30 pm

Web Title: prasad oak chandramukhi teaser avb 95
Next Stories
1 बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ‘या’ अभिनेत्यासोबत अडकणार लग्नबंधनात
2 शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम यांचा खुलासा, म्हणाली दोन्ही लग्न ..
3 कंगनाने चाहत्यांना दिल्या गुढीपाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा
Just Now!
X