सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा सुनावताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठवण्यात आला. प्रशांत भूषण यांनी ट्विट करून सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं होतं. यावर आज शिक्षा सुनावताना प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठवण्यात आला. तर यानंतर प्रशांत भूषण यांनी लगेचच एक ट्विट केलं. प्रशांत भूषण यांनी ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयानंतर आपले वकील आणि ज्येष्ठ सहकारी राजीव धवन यांनी एक रुपयाचं योगदान दिलं असून आपण ते तात्काळ स्वीकारलं असल्याचं म्हटलं.

पाहा प्रशांत भूषण यांचं ट्विट-

आणखी वाचा- अवमान प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला प्रशांत भूषण देणार आव्हान, म्हणाले…

त्यावरून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी प्रशांत भूषण यांच्यांबद्दल मार्मिक ट्विट केलं. “एक रुपया दाम लगाया सुप्रीम कोर्ट ने बंदे का ! और वो भी उसने अपने वक़ील से लिया!! जय हो!! म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांचं मूल्य केवळ १ रूपया इतकंच असल्याचं दाखवून दिलं आणि तो एक रूपयासुद्धा त्यांना त्यांच्या खिशातून देता आला नाही. त्यांच्या वकिलांनी त्यांनी रूपया दिला”, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

अनुपम खेर यांचं ट्विट-

आणखी वाचा- सर्वोच्च न्यायालय अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांनी १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड भरण्यास मुदत दिली आहे. दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास तसंच तीन वर्षांकरिता वकिली करण्यापासून रोखलं जाईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. न्यायालय अवमान प्रकरणी प्रशांत भूषण न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली.