News Flash

“मुलांना थंड हवेच्या ठिकाणी जरूर न्या, पण…”, प्रवीण तरडेंचा पालकांना सल्ला

त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियाद्वारे अनेकदा त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकताच प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पालकांना सल्ला दिला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.

फेसबुकवर प्रवीण तरडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते मुलासोबत सिंहगड किल्ल्यावर बसले असल्याचे दिसत आहे. दरम्यान त्यांच्या हातात ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी असल्याचे दिसत आहे.

‘मुलांना ट्रिपला “थंड हवेच्या“ ठिकाणी जरूर न्या.. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका.. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा’ असे म्हणत त्यांना पालकांना सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियावर प्रवीण तरडेंची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 11:19 am

Web Title: pravin tarde gave valuable advice to parents avb 95
Next Stories
1 मलायकाने शेअर केला बोल्ड फोटो, सोहेल खानच्या पत्नीने केली कमेंट
2 …म्हणून लग्नानंतर नताशा दलाल झाली ट्रोल
3 ‘आम्ही दोन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो पण..’; सिद्धार्थने सांगितली लग्नापूर्वीची गोष्ट
Just Now!
X