News Flash

PHOTO : प्रिती आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचा असा अंदाज पाहिलात का?

वर्ल्डटूरदरम्यान प्रिती आणि ऐश्वर्या रायमध्ये घट्ट मैत्री जमली होती.

ऐश्वर्या राय बच्चन, प्रिती झिंटा

‘डिंपल गर्ल’ म्हणून ओळख असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर आपले जुने फोटो शेअर करत ती नेहमीच चाहत्यांना खूश करत असते. असाच एक फोटो तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा फोटो पाहून फक्त प्रितीचेच नाही तर ऐश्वर्या रायचेही चाहते खूश होतील. ऐश्वर्या आणि प्रितीसोबतच या फोटोमध्ये मिनी माथूरसुद्धा दिसतेय.

हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये प्रितीने लिहिलं की, ‘माझ्या जुन्या फोटोंमध्ये हा फोटो सापडला. वर्ल्डटूरला गेलो असताना नाइट आऊट करताना काढलेला हा फोटो.’ बॉलिवूड गाजवणाऱ्या या दोन्ही अभिनेत्रींचा बिंदास अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी प्रितीने १९९९ मधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये प्रितीला ओळखणंही कठीण होतं. तेव्हा तिने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. त्या मॅगझिनचा कव्हर फोटो तिने शेअर केला होता. या फोटोमध्ये प्रितीची ओळख असलेली खळी मात्र दिसत नव्हती. त्यामुळेच कदाचित तिला ओळखणं कठीण जात होतं.

वाचा : ‘बोस डेड ऑर अलाइव्ह’

दरम्यान प्रितीच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच ‘भैय्याजी सुपरहिट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत सनी देओल आणि अमिषा पटेलसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पाठक करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 6:36 pm

Web Title: preity zinta shares throwback picture with aishwarya rai bachchan
Next Stories
1 ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’
2 ‘बोस डेड ऑर अलाइव्ह’
3 चिमुकल्या चाहतीसोबतचा ऐश्वर्याचा हा व्हिडिओ पाहिलात का?
Just Now!
X