News Flash

‘प्रेम पॉइजन पंगा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

एका बेसावध क्षणी जुईचं खरं रुप आलापच्या समोर येतं आणि..

एक इच्छाधारी नागिण आणि एक सर्वसामान्य तरुण यांची धमाल विनोदी प्रेमकथा झी युवा वाहिनीवरील प्रेम पॉइजन पंगा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. जुई ही एक मनमिळाऊ, सतत आनंदी राहणारी आणि दुसऱ्यांनाही भरभरुन आनंद देणारी मुलगी पण तिच्या आयुष्याचं एक कटू सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं. मनुष्य रुपात वावरणारी जुई जेव्हा तिच्या या आयुष्याचा तिढा सोडवू पहात असते तेव्हा ती आलाप या अत्यंस साध्या सरळ आणि समंजस तरुणाला भेटते आणि तिचं अवघं आयुष्यच बदलून जातं. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून ते सुखाचा संसार असा या जुई-आलापचा प्रवास प्रेम पॉइजन पंगा या मालिकेमध्ये पहायला मिळाला आणि आता ही मालिका एका महत्वाच्या आणि अंतिम वळणार येऊन ठेपलीये.

एका बेसावध क्षणी जुईचं खरं रुप आलापच्या समोर येतं आणि तो हादरुन जातो पण त्यानंतरही आलाप तिला स्विकारतो. आता मालिका अंतिम टप्प्यावर येत असताना जुईच्या आयुष्यातलं हे रहस्य आता तिच्या सासरच्यांसमोर उलगडणार आहे आणि त्यापुढे काय होणार, तिच्या सासरची माणसं जुईला स्विकारणार का हे मात्र आगामी भागात पाहायला मिळेल.

येत्या २५ सप्टेंबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यानंतर झी युवावर कोणती नवी मालिका सुरु होणारे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 2:12 pm

Web Title: prem poison panga marathi serial to end soon ssv 92
Next Stories
1 प्रसिद्ध अभिनेत्याचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू
2 ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणार करण पटेल?
3 कंगनानं खरंच शिवसेनेला मतदान केलं का, नेमकं सत्य काय?
Just Now!
X