18 February 2019

News Flash

‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रिया वरियर करतेय ब्रेकअप

प्रिया 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी ब्रेकअपच्या गोष्टी करत आहे

प्रिया वरियर

गेल्या काही दिवसांपासून प्रिया प्रकाश वारियर हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. प्रियाच्या नावावरुन सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, पोस्ट आणि मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या डोळ्यांच्या हाव भावांनी ती अनेकांचे हृदय जिंकत आहे. पण लाखो लोकांची मनं जिंकणारी प्रिया आज ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी ब्रेकअपच्या गोष्टी करत आहे.

सध्या सोशल मीडियावर तिचा एक डबस्मॅश व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमातली ‘ब्रेकअप साँग’ गाताना दिसत आहे. या व्हिडिओत प्रियासोबत तिची मैत्रिणही आहे. डबस्मॅश व्हिडिओमध्ये फक्त ओठ हलवावे लागतात. पण त्यातही अभिनय करावा लागतो. या डबस्मॅश व्हिडिओमध्ये तिने चांगला अभिनय केला आहे.

या व्हिडिओआधी प्रियाचा अजून एक व्हिडिओ समोर आला होता. यात प्रियाने ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमातीलच चन्ना मेरेया हे गाणे गायले होते. या व्हिडीओमधून एक्सप्रेशन क्वीन प्रिया चांगले गातेही हेच स्पष्ट होते. एकंदरीत प्रियाला ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा फार आवडलेला दिसतो.

आपल्या खाजगी आयुष्याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियाने तिचे मुंबई कनेक्शनही सांगितले. प्रियाचा जन्म केरळमध्ये झाला असला तरी बालपणीचा काळ तिचा मुंबईत गेला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले आहे. प्रियाचे वडील प्रकाश वरियर सेंट्रल एक्साइज डिपार्टमेण्टमध्ये काम करतात. मुंबईत काही वर्ष नोकरी केल्यानंतर प्रकाश यांनी केरळमध्ये बदली करुन घेतली. सध्या ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. प्रिया आई- बाबा, छोटा भाऊ आणि आजी- आजोबा अशा माणसांनी भरलेल्या घरात राहते.

First Published on February 14, 2018 7:07 pm

Web Title: priya prakash dubsmash viral on valentine day breakup song