23 January 2020

News Flash

प्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात…

अनेक नेटकऱ्यांनी प्रियांका चोप्राला दमा असल्याची आठवण करुन देत तिच्यावर टीका केली आहे

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा तिच्या नवऱ्यासोबतचा म्हणजेच निक जोनाससोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रियांका चोप्रा सिगारेट ओढताना दिसते आहे. या फोटो वरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. तुला फक्त दिवाळीतच अस्थमा झाला होता का? असा प्रश्न विचारत काही नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर निशाणा साधला आहे. प्रियांका चोप्राने नुकताच तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. निकशी लग्न केल्यानंतर तिचा हा पहिलाच वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही झाला अशात आता निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये निक जोनास सिगार ओढताना तर प्रियांका चोप्रा सिगारेट ओढताना दिसते आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये निक जोनास, प्रियांका चोप्रा आणि प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा हे तिघेही एका बोटीमध्ये बसले आहेत. या फोटोवरून प्रियांका चोप्रावर चांगलीच टीका होताना दिसते आहे. मागच्या दिवाळीत प्रियांका चोप्राने सर्व भारतीयांना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करताना प्रियांकाने तिला अस्थमा असल्याची आठवण करुन दिली होती. आता तिचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला याच आवाहनाची आठवण करुन देत तू ढोंगी आहेस असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Hypocrisy ki BHI sima hoti h

First Published on July 22, 2019 7:44 am

Web Title: priyanka chopra called hypocrite for smoking twitter reminds her of being asthmatic scj 81
Next Stories
1 नाट्यक्षेत्रातील तरुण कलाकाराच्या आत्महत्येने पुण्यात खळबळ
2 ‘सुपर ३०’ची १०० कोटींच्या दिशेने घोडदौड सुरु, ९ दिवसात कमावले इतके कोटी
3 आशा भोसलेंना ‘स्वामीरत्न’, तर स्वप्नील जोशीला मिळाला ‘स्वामीभूषण’ पुरस्कार
Just Now!
X