राज्यात करोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने या लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“ब्रावो इंडिया, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात सुरु झाली आहे. भारतीय अधिकारी, चिकित्सा आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांना मदत करणाऱ्या सर्व करोना योद्ध्यांचे आम्ही आभारी आहोत.” अशा आशयाचं ट्विट करुन प्रियांकाने शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Bravo India! Congratulations to
Indian authorities, medical & health teams for starting off the massive Covid vaccination drive. Forever grateful to our frontline heroes who have been risking their lives this past year to save others https://t.co/VA56OzVLUy— PRIYANKA (@priyankachopra) January 16, 2021
दिवसभरातील लसीकरणाची आकडेवारी
सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०).
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2021 3:31 pm