13 November 2019

News Flash

प्रियांकाला लवकरच व्हायचय आई

प्रियकांने अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे

सध्या बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ‘द स्काय ईज पिंक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत अभिनेता फरहान अख्तर आणि जायरा वसीमदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रियांका या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान तिने तिच्या आयुष्याशी संबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रियांका तिचा आगामी चित्रपट ‘द स्काय ईज पिंक’चे प्रमोशन केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही करताना दिसत आहे. अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाला आई होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. ‘आता मी आई होण्यासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. देवाच्या आशिर्वादाने सर्वांच्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण येत असताता. मी आणि निकदेखील या क्षणांची वाट पाहात आहोत’ असे प्रियांका म्हणाली आहे.

आणखी वाचा : देसी गर्लसाठी निकने उचलला सिलेंडर, जाणून घ्या नेमकं काय झालं

शोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियांका या चित्रपटातून तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतत आहे. २०१६ मध्ये तिचा ‘जय गंगाजल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात एका कुटुंबाची भावनिक कथा दाखवण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रियांका-फरहानची प्रेमकहाणी आणि त्यानंतर त्यांच्या मुलीला होणारा दुर्मिळ आजार याबद्दल दाखवण्यात येणार आहे. प्रियांका इतक्या दिवसांनंतर बॉलिवूडमध्ये परतत असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

First Published on October 9, 2019 1:37 pm

Web Title: priyanka chopra desperate about his pregnancy avb 95