अभिनेत्री प्रियांचा चोप्रा सध्या तिच्या ‘क्वांटिको २’ या सिरीजमधील भूमिकेमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडसह प्रियांका हॉलिवूड विश्वातही तितक्याच सहजतेने वावरते हे तिच्या मुलाखतींद्वारे आणि रेड कार्पेटवरील तिच्या अंदाजामुळे समजतेच. प्रियांका नुकतीच एका मुलाखतीच्या निमित्ताने ‘अॅलेन डीजेनेर्स’ या कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमात प्रियांकाने मोठया उत्साहाने अॅलेनच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात अॅलेनने प्रियांकाला टकीला शॉट्सही मारायला लावले. त्यावेळीही प्रियांकाने ती वेळ चांगलीच निभावून नेली.
प्रियांका या कार्यक्रमात येण्याचे कळताच सोशल मीडियावर तिच्या विषयीच्या अनेक चर्चांना उधाण आले होते. या कार्यक्रमात प्रियांका आल्यावर तिच्या ‘क्वांटिको २’ आणि ‘बेवॉच’विषयीच्या चर्चा रंगणार अशीच शक्यता अनेकांनी रंगवली होती. पण, वास्तवात मात्र तसे काही झालेच नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अॅलेनने प्रियांकाला काही दिवसांपूर्वी तिने रेड कार्पेटवर खेळलेल्या ‘पिंकोलो ड्रिंकिंग गेम’विषयी विचारले. त्यावर प्रियांका म्हणाली की, ‘त्या दिवशी मी काहीही खाल्ले नव्हते. त्यामुळे त्या दिवशी मी जेव्हा टकीला शॉट प्यायले तेव्हा मला त्याची झिंग आली’.
प्रियांकाच्या या वक्तव्याला काहीसे विनोदी रुप देत अॅलेनने तिला ‘तू आज काही खाऊन आली आहेस का?’, असे विचारले. त्या संधीचा पूर्ण फायदा घेत अॅलेनने प्रियांकासोबत एक खेळ खेळण्याचे ठरवले आणि या खेळातच प्रियांकाच्या वाट्याला टकीला शॉट्सचा एक ग्लास आला. प्रियांकानेही मोठ्या उत्साहाने एक टकीला शॉट मारत, त्यानंतर अॅलेनच्या पुढील प्रश्नांना उत्तरे दिली.
या चॅट शोमध्ये गप्पा मारताना प्रियांकाने काही गोष्टींचाही खुलासा केला. त्यासोबतच तिने आपल्याला ‘एरोनॉटिकल इंजिनिअर’ व्हायचे होते, हे सुद्धा स्पष्ट केले. अॅलेनने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियांकासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
.@PriyankaChopra has been Miss India and Miss World, and today she’s on my show for the first time. I should’ve given her a sash. pic.twitter.com/dbEybDIs8V
— The Ellen Show (@EllenDeGeneres) October 25, 2016