News Flash

‘त्या’ ट्विटवरून प्रियांका चोप्राच्या आईने मॅनेजरला खडसावले!

प्रकाश जाजू हा पूर्वी प्रियांकाचा व्यवस्थापक म्हणून काम बघत होता.

PRIYANKA CHOPRA : प्रकाश जाजू खोटे बोलत असून तो कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याचे आई-वडील प्रियांकाकडे दयेची याचना करत असल्याचे मधु चोप्रा यांनी म्हटले आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने कारकीर्दीच्या सुरूवातीच्या टप्प्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा करणाऱ्या प्रकाश जाजूला प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी ट्विटरवरून चांगलेच खडसावले आहे. प्रकाश जाजू खोटे बोलत असून तो कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याचे आई-वडील प्रियांकाकडे दयेची याचना करत असल्याचे मधु चोप्रा यांनी म्हटले आहे. प्रियांकाने त्याला व्यवस्थापकपदावरून दूर केल्यानंतर प्रियांका आणि जाजू यांच्यात वितुष्ट आले होते. त्यानंतर जाजू याने प्रियांका आपले पैसे देत नसल्याचे सांगत पोलिसांत तिच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. यानंतर प्रियांकाच्या वडिलांनी जाजूविरुद्ध खटला दाखल करत त्याची रवानगी कारागृहात केली होती, असेदेखील प्रियांकाच्या आईने ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रियांका चोप्राने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
प्रकाश जाजू हा पूर्वी प्रियांकाचा व्यवस्थापक म्हणून काम बघत होता. त्याने काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून प्रियांकासंदर्भात खळबळनजक खुलासा केला होता. प्रियांका चोप्रा ही जरी आता खंबीर असली तरी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला फार असुरक्षित वाटत होते. त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण मी तिला वेळीच तसे करण्यापासून थांबवले. पीसी आणि तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असीम यांच्यात बरेच वाद होत असत. याचा तिला बराच त्रास व्हायचा. याबाबत ती मला अगदी मध्यरात्रीही फोन करून सांगत असे, प्रकाश जाजू यांनी म्हटले होते. मात्र, प्रियांकाच्या आईने हे सर्व दावे फेटाळत प्रकाश जाजूला चांगलेच खडसावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 4:22 pm

Web Title: priyanka chopra mother slams prakash jaju for suicide comments
Next Stories
1 ‘त्या’ चौघांसोबत आलियाचा रोमान्स!
2 पाहा ‘अझर’ चित्रपटाचा ट्रेलर!
3 प्रशांत दामले यांची गुप्तहेरगिरी!
Just Now!
X