अभिनेत्री प्रियांका चोप्राने आजवर तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांना स्पष्टपणे सांगितल्या. वयाच्या पाचव्या वर्षापासून मला अस्थमाचा त्रास असल्याचा खुलासा तिने नुकताच केला. ट्विटरच्या माध्यमातून तिने याविषयी सांगितलं असून ही गोष्ट काही लपवण्यासारखी नाही असं ती म्हणाली. एका जाहिरातीचं शूटिंग ट्विट करत असताना प्रियांकाने अस्थमाविषयी सांगितलं.
‘मला चांगल्याप्रकारे ओळखणाऱ्यांना हे माहित आहे की मला अस्थमा आहे आणि यात लपवण्यासारखं काहीच नाही असं मला वाटतं. अस्थमाने माझ्यावर ताबा मिळवण्याआधी मला अस्थमावर ताबा मिळवणं गरजेचं आहे हे मला माहित होतं. जोपर्यंत माझ्याकडे इनहेलर आहे तोपर्यंत मला माझं लक्ष्य गाठण्यात आणि कोणत्याही अडचणींशिवाय जीवन जगण्याला अस्थमा रोखू शकत नाही,’ असं ट्विट प्रियांकाने केलं. वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रियांकाला अस्थमाचा त्रास आहे.
Those who know me well know that I'm an asthmatic. I mean, what’s to hide? I knew that I had to control my asthma before it controlled me. As long as I’ve got my inhaler, asthma can’t stop me from achieving my goals & living a #BerokZindagi.
Know more: https://t.co/pdroHigNMK https://t.co/P50Arc9aIo
— PRIYANKA (@priyankachopra) September 17, 2018
Video : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील बिग बींचा लूक पाहिलात का?
प्रियकर निक जोनासशी साखरपुड्यानंतर प्रियांका तिच्या चित्रपटांमध्ये व्यग्र झाली आहे. सध्या ती फरहान अख्तर आणि झायरा वसीम यांच्यासोबत ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. सोनाली घोष दिग्दर्शित हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमान याठिकाणी चित्रपटाचं शूटिंग पार पडणार आहे.