बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भारतातचं नाही तर परदेशातही बोलबाला आहे. क्वांटिकोसाठी पुरस्कारप्राप्त प्रियांका नुकतीचं स्क्रीन अॅक्टर गील्ड अवॉर्डमध्येही झळकली होती. तिथे तिने पुरस्कारप्रदान केले होते.  त्यानंतर आता प्रियांकाची वर्णी चक्क ऑस्करमध्ये लागली आहे. अकॅडमी पुरस्काराच्या अधिकृत संकेस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
८८वा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणा-या व्यक्तींची दुसरी यादी ऑस्कर निर्माता डेव्हिड हिल आणि रेगिनाल्ड हुडलिन यांनी जाहीर केली आहे. ऑस्कर पुरस्कार प्रदान करणा-या व्यक्तिंमध्ये प्रियांकाव्यतिरीक्त स्टीव करेल, क्विंसी जोन्स, ब्यांग-हान ली, जैरेड लेटो, जुलिएन मोर, ओलिविया मान, जेसन सीगल,  एन्डी सर्किस, केरी वॉशिंग्टन यांच्या नावाचा समावेश आहे.


२८ फेब्रुवारीला ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार आहे.