News Flash

मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताबद्दल काय म्हणाले अमिताभ बच्चन

मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून ट्विट करुन ते सुखरुप असल्याची माहिती दिली आहे.

बिग बींनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा व्हिडिओही ट्विट केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी हेलिकॉप्टर अपघातात नशिबाने बचावल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. बिग बींनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा व्हिडिओही ट्विट केला आहे.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात. सर्वजण सुखरुप आहेत…. नशिबाने बचावले. अपघाताचा व्हिडिओ….,’ असे बिग बींनी ट्विट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हेलिकॉप्टरमध्ये त्यांचे सचिव प्रवीण परदेशी, स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आणि केतन पाटील हे तिघेहीजण प्रवास करत होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून ट्विट करुन ते सुखरुप असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ खरचटले आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांचा रक्तदाब आणि इतर गोष्टी व्यवस्थित असल्याचे सांगितले. त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

भाजपच्या शिवार यात्रेला लातूर जिल्ह्यातील निलंगा येथून गुरुवारपासून सुरूवात झाली. त्यासाठी मुख्यमंत्री लातूरला गेले होते. येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मुंबईकडे येण्यासाठी निघालेले. त्यांचे हेलिकॉप्टर टेकऑफ केल्यानंतर लगेच जमिनीवर कोसळले. दुर्घटनेच्या वेळी हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्याने अनर्थ टळला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर २२ वर्षे जुने असल्याची माहिती आता समोर येत आहे. यापूर्वीही या हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 7:42 pm

Web Title: providential escape says amitabh bachchan on devendra fadnavis chopper crash landing
Next Stories
1 ‘चाहूल’मध्ये स्वप्नाली पाटीलची एण्ट्री
2 अमेय, सखी, सुव्रतच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ची शंभरी
3 Kaala Karikaalan first look: ‘काला’चा फर्स्ट लूक पाहून तुम्हीही म्हणाल, माइंड इट!
Just Now!
X