News Flash

साहोमधील ‘सायको सैय्या’ गाण्यात प्रभास-श्रद्धाची भन्नाट केमिस्ट्री

या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

सायको सैया

‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत अभिनेश्री श्रद्धा कपूर झळकणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ‘सायको सैय्या’ या गाण्याची ही झलक पाहून प्रभास आणि श्रद्धाच्या भन्नाट केमिस्ट्रीची कल्पना येते.

या गाण्यात प्रभास आणि श्रद्धा एका क्लबमध्ये नाचताना दिसत आहेत. ध्वनी भानूशालीने हे गाणे गायले आहे. तनिष्क बागचीने हे गाणे लिहिले आहे आणि या गाण्याला संगीतही दिले आहे. हे संपूर्ण गाणे ८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातील श्रद्धा आणि प्रभासचा ग्लॅमरस अंदाज बघता हे गाणे नक्कीच लोकप्रिय होईल.

‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १३ जूनला प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘साहो’च्या सगळ्या कलाकारांची धमाकेदार अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये श्रद्धाने घेतलेली एण्ट्री तर पाहण्यासारखी आहे.

हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:54 pm

Web Title: psycho saiyaan teaser sahoo prabhas shraddha kapoor djj 97
Next Stories
1 पूजा हेगडेचा हा फोटो झाला व्हायरल
2 सहकलाकाराला हृदयविकाराचा झटका, सलमान घेतोय काळजी
3 ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चे कलाकार १९ वर्षानंतर पुन्हा एकत्र
Just Now!
X