30 September 2020

News Flash

दिशा सालियन मृत्यू प्रकरण : …आणि या अभिनेत्याने मागितली सुरज पंचोलीची माफी

पोलीस तक्रार होताच अभिनेता घाबरला; मागितली सुरज पंचोलीची माफी

“माझ्याकडून चूक झाली. मला तसं म्हणायचं नव्हतं. कृपया माझ्याविरोधात केलेली तक्रार मागे घ्या.” अशी विनंती टीव्ही अभिनेता पुनीत वशिष्ठ याने सुरज पंचोलीला केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्या प्रकरणावरुन पुनीतने सुरजवर टीका केली होती. या टीकेमुळे सुरजचे कुटुंबीय संतापले अन् त्यांनी पुनीत विरोधात पोलीस तक्रार केली. या तक्रारीमुळे पुनीतने दिशा प्रकरणातून माघार घेत आज तकला दिलेल्या मुलाखतीत सुरजची माफी मागितली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी आत्महत्या केली होती. दिशाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूचा त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? यादृष्टीने बिहार पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणावरुन अभिनेता पुनीत वशिष्ठ याने सूरज पंचोलीवर टीका केली होती. त्याने सुरजवर टीका करणारा एक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र सुरजचे कुटुंबीय संतापताच त्याने ती पोस्ट डिलिट केली अन् माफी देखील मागितली.

काय म्हणाला पुनीत वशिष्ट?

“मला माफ करा. ती पोस्ट मी चूकून केली होती. कोणावरही टीका करण्याचा माझा उद्देश नव्हता. मला वाटलं नव्हतं लोक माझ्या एका पोस्टकडे इतक्या गांभिर्याने पाहतील. मी ती पोस्ट डिलीट केली आहे. दिशा नावाच्या तरुणीबद्दल मला काहीच माहित नव्हतं. सुशांतच्या मृत्यूनंतर माध्यमांद्वारे मी हे नाव ऐकलं. माझी लढाई सुरजसोबत नाही. केवळ घराणेशाही विरोधात आहे. कृपया माझ्या विरोधात कुठलीही तक्रार करु नका.” असं म्हणत पुनीत वशिष्ठ याने सुरज पंचोलीची माफी मागितली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 7:14 pm

Web Title: puneet vashist apologises sooraj pancholi disha salian case mppg 94
Next Stories
1 गोविंदाला ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचे होते आणखी काम
2 कोंकना सेन शर्मा व रणवीर शौरी यांचा घटस्फोट
3 संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच ऑनस्क्रीन ‘संजू’ने घेतली भेट
Just Now!
X