News Flash

‘रेहना है तेरे दिल में’मधील ही जागा मुंबईमध्ये कुठे आहे?, १९ वर्षांनंतर आर माधवनचा खुलासा

नुकताच या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत.

बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन १५ ते २० वर्षे उलटून गेली असली तरी सुद्धा आज चाहते ते तितक्याच आनंदाने पाहताना दिसतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे रेहना है तेरे दिल में. या चित्रपटाला नुकतीच १९ वर्षेपूर्ण झाली आहे. दरम्यान चित्रपटातील एका सीनविषयी चाहत्याने आर माधवनला प्रश्न विचारला आहे. त्यावर आर माधवनने दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला ही हसू येईल.

ट्विटरवर एका यूजरने रेहना है तेरे दिल में या चित्रपटाती आर माधवन आणि दिया मिर्झा यांचा समुद्र किनारी बसले असतानाच्या सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘आर माधवन. रेहना है तेरे दिल में चित्रपट प्रदर्शित होऊन १९ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आपण ती साजरी करत आहोत. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ते आज पर्यंत मी ही जागा मुंबईमध्ये कुठे आहे हे शोधत आहे. कृपया मला सांग’ असे त्या यूजरने म्हटले होते. तसेच हे ट्विट त्याने आर माधवनला टॅग केले होते.

या ट्विटवर आर माधवनने उत्तर देत ‘ही जागा दक्षिण अफ्रिकेमध्ये आहे’ असे म्हटले आहे. तसेच त्याने त्या सोबत हसण्याचे इमोजी देखील वापरले आहेत.

रेहना है तेरे दिल में या चित्रपटात आर. माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला होता. तसेच या चित्रपटानंतर आर माधवनला मॅडी म्हणून लोकं ओळखू लागले होते. त्यावेळी दिया मिर्झा ही १९ वर्षांची असल्याचे म्हटले जाते. तसेच ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘मिनाले’चा हिंदी रिमेक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 6:53 pm

Web Title: r madhavan gave reply to fan who is asking about shooting place in rhtdm movie avb 95
Next Stories
1 “अश्लिलता पसरवणं थांबवा”; इरॉसच्या नवरात्री शुभेच्छांवर कंगना संतापली
2 ‘तुझं माझं जमतंय’ मालिकेत दिसणार अभिनेता रोशन विचारे
3 हृतिक रोशनच्या आईला करोनाची लागण
Just Now!
X