देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. सोशल मीडियावर औषधांच्या उपलब्धतेची माहिती अनेक जण शेअर करत मदतीचा हात पुढे करत आहेत. मात्र अशात काही ठिकाणी फसवणूक होत असल्याची प्रकरणं समोर येऊ लागली आहे. यानंतर अभिनेता आर माधवन याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता आर माधवन याने एक ट्विट शेअर करत औषधांचा सुरू असलेला काळा बाजार आणि फसवणूक यावर संताप व्यक्त केलाय. आर माधवनने एक फोटो शेअर केलाय. त्यासोबत पोस्टमध्ये तो म्हणाला, “मला देखील हे आलं आहे. कृपया सतर्क रहा. आपल्यातसुद्धा असे राक्षस आहेत.” असं त्याने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.

तर या फोटोत म्हंटलंय, ” फ्रॉड अलर्ट..मिस्टर अजय अग्रवाल 3 हजार रुपयात रेमडेसिवीर उपल्बध करून देत आहेत. ते तुमच्याकडून IMPS च्या माध्यमातून एडवान्समध्ये पेसै मागतील. 3 तासाच भारतात कुठेही औषध उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगतील. मात्र त्यानंतर ते फोन उचलणार नाहीत. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान. हा माणूस फसवणूर करणारा आहे.” ही पोस्ट शेअर करत आर माधवनने लोकांना सावध केलं आहे.

वाचा: अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा ; दिग्दर्शक म्हणाला, “कपडे काढ आणि…”

दरम्यान,गेल्या २४ तासांत तर भारतात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नवे करोनाबाधित सापडले आहेत. २४ तासांत ४ लाखांहून जास्त करोना रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. या आकडेवारीमुळे एक नकोसा विक्रम भारताच्या नावावर आला आहे.