News Flash

‘RIP Logic’… सलमानच्या ‘रेस ३’मुळे नेटकऱ्यांचं डोकं भणभणलं

ट्रेलरमध्ये कुठेच कोणत्याच गोष्टीला तारतम्य नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

सलमान खान

वादविवाद, आरोप- प्रत्यारोप आणि न्यायालयीन फेरा या सर्व गोष्टींना मागे सारत सलमान खान नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा याच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘रेस ३’ या चित्रपटातून सलमान काही साहसदृश्ये करताना दिसणार आहे. नुकताच या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

मुख्य म्हणजे ट्विटर ट्रेंडमध्ये भाईजानच्या चित्रपटाचा ट्रेलर ट्रेंडमध्येही आला. पण, त्यातील संवाद, साहसदृश्यं आणि एकंदरच सर्व कलाकारांचा अंदाज अनेकांनाच खटकला. वास्तवाशी कोणताही संबंध नसल्याचा इशारा चित्रपट सुरु होण्याआधी दिला जातो खरा, पण, इथे मात्र ट्रेलरमध्ये कुठेच कोणत्याच गोष्टीला तारतम्य नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. काहींनी तर RIP Logic असं म्हणत ट्रेलरविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

Next Stories
1 अवघ्या काही दिवसांमध्येच वादाच्या भोवऱ्यात अडकलं सोनम- आनंदचं लग्न
2 ‘छोटी मालकीण’मध्ये नवा ट्विस्ट; पाककृती स्पर्धा जिंकून रेवती करेल का श्रीधरला मदत?
3 आता जपानीही झाले बाहुबलीचे फॅन, पाठवल्या या अनोख्या भेटवस्तू
Just Now!
X