कलर्स मराठी वाहिनीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेत राधा – प्रेमच्या आयुष्यात आजवर बऱ्याच घटना घडल्या. दीपिका आणि देवयानीचा राधाला जीवे मारण्याचा डाव असो वा राधा – प्रेमला कायमचे दूर करण्यासाठी रचलेले कारस्थान असो वा दीपिकाने खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसं करण्याचा केलेला प्रयत्न असो. सगळेच राधाने मोठ्या धीराने आणि हिमतीने सहन केले. प्रत्येक संकटाला सामोरी गेली. अत्यंत समजूतदारपणे परिस्थिती हाताळली. आता राधाने दीपिकाच्या प्रत्येक कारस्थानाला उत्तर देण्याचे ठरवले आहे. राधा दीपिकाविरोधात ठामपणे आणि खंबीरपणे उभी राहिलेली प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिकाच्या प्रत्येक डावाला आणि कारस्थानाला ती उत्तर देताना प्रेक्षकांना दिसणार आहे. माधुरीची प्रकृती अचानक बिघडल्याने प्रेम- माधुरीला न्युझीलंडला जावे लागले. त्यानंतर दीपिकाने तिचे डाव खेळण्यास सुरुवात केली. परंतु आता दीपिकासमोर राधा खंबीरपणे उभी असल्याने दीपिका कुठला पलटवार करणार? कोणती नवी खेळी खेळणार? राधा त्याला कसे आणि काय उत्तर देणार? हे बघणे रंजक ठरणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली सोम ते शनि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

(आणखी वाचा : ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेत लक्ष्मीसमोर येणार मल्हारचे वेगळे रूप)

मालिकेमध्ये आता राधा पर्व सुरु झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. राधा घरासोबतच व्यवसायदेखील आता सांभाळू लागली आहे. राधाच्या वडिलांना अटक करून पुन्हा त्यांना सोडवणं यामागे दीपिकानेच कट रचला होता. हे करून दीपिकाने राधाच्या कुटुंबाचा विश्वास मिळवला. परंतु दीपिकाचा हा डाव होता हे मात्र राधाला कळून चुकले. राधाच्या घरच्यांना तिच्याच विरुध्द करण्याचा दीपिकाचा डाव यशस्वी होईल का? राधा याला काय उत्तर देईल? मालिकेत पुढे काय होईल? राधा कशी दीपिकाला मात देईल? दीपिका कुठली नवी खेळी खेळेल? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radha prem rangi rangali new twist in radha life
First published on: 13-11-2018 at 16:25 IST