राधा प्रेम रंगी रंगली ही नवी मालिका उद्यापासून कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होत आहे. मालिकेमधील राधा म्हणजे वीणा जगताप मालिकेबद्दल खूपच उत्सुक आहे. तिची मुख्य भूमिका असलेली पहिलीच मालिका असून तिने प्रेक्षकांबरोबर तिचे काही अनुभव शेअर केले आहेत.

वाचा : ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांची यशोगाथा महानाट्य रुपात

पहिलीच मालिका ती पण कविता लाड – मेढेकर, सचित पाटील, शैलेश दातार यांसारख्या कलाकरांबरोबर करायला मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. या सगळ्यांनी मला अवघ्या काही दिवसांतच स्वीकारले याचा मला खूप आनंद आहे. अनेक गोष्टी मला या सगळ्यांकडून शिकायला मिळत आहेत. पहिल्याच मालिकेमध्ये मला राजेश मापुसकर यांच्याबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. याच दरम्यान त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीदेखील शिकता आल्या. त्यांनी आमच्या मालिकेचे शीर्षक गीत अप्रतिमरीत्या दिग्दर्शित केले आहे. त्यांच्याकडून शिकता आलेली पहिली आणि महत्वाची बाब म्हणजे ‘समर्पण’ आणि दुसरी म्हणजे ‘अशक्य असे काहीच नाही’. अभिनय क्ष्रेत्र असो वा दुसरे कुठलेही या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात असं मला वाटतं.

TOP 10 NEWS वाचा : परेश रावल यांनी डिलीट केलेल्या ट्विटपासून मराठी अभिनेत्याच्या लग्नापर्यंत..

आम्ही सेटवर खूप धम्माल मस्ती करतो, याचबरोबर मला सहकलाकारांकडून खूप गोष्टी शिकायला देखील मिळत आहेत. खासकरून कविता लाड, सचित आणि ऋग्वेदी प्रधान यांच्याकडून. काहीही झालं तरी अधिकाधिक समर्पणाने काम करायचे ही खूप महत्त्वाची गोष्ट मी सचित पाटीलकडून शिकले. काम हे नेहेमीच लक्ष केंद्रित करून करावे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये हे कविता लाड – मेढेकर यांनी मला सांगितले. मी आणि आमच्या संपूर्ण टीमने या मालिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि आता ही मालिका उद्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अखेर ही गोष्ट घडली याचा मला खूप खूप आनंद आहे.