करोना विषाणूमुळे संपूर्ण देशात जणू नैराश्येचं वातावण निर्माण झालं आहे. मात्र नैराश्येच्या या अंधाराला दूर करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी रात्री ९ वाजता देशातील १३० कोटी भारतीयांना घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले आहे. यावरुन बॉलिवूड दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांने नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाला राहुल?

“दिव्यांमध्ये काय वापरायचं तेल की घी? ऑलिव्ह ऑईल वापरलं तर चालेल का? कदाचित त्यामुळे करोना विषाणू लवकर पळेल.” अशा आशयाचे ट्विट करुन राहुल ढोलकिया याने मोदींच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

राहुल व्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नू, हेमा मिलिनी, अभिनेता तरुण गर्ग, वीरदास आणि एजाज खान यांनी देखील मोदींच्या वक्तव्यांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले इतर कलाकार पाहूया?

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्कमतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, ” असं भावनिक आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं. आपण सर्वांनी एकत्र येऊन या करोनाच्या अंध:काराला पळवून लावूयात असं सांगत मोदींनी आपलं भाषण संपवलं.