News Flash

फ्लॅशबॅक : दोन शोमन जेव्हा एकत्र येतात…

हिंदी चित्रपटसृष्टीचा अस्सल 'शोमन' म्हणून कायम राज कपूरचे नाव घेतले जाते.

हिंदी चित्रपटसृष्टीचा अस्सल ‘शोमन’ म्हणून कायम राज कपूरचे नाव घेतले जाते. पण मग शोमनशीपमधे राज कपूरचा वारस कोण हा प्रश्न देखिल स्वाभाविकपणे पडतो… ऐंशीच्या दशकापासून सुभाष घईचे शोमन म्हणून नाव घेतले जाऊ लागले. शोमन म्हणजे मसालेदार मनोरंजनाची हुकमी हमी. यांची प्रत्येक गोष्ट जणू बातमीत राहते. गीत-संगीत-नृत्य यांचे दिमाखात रुपेरी सादरीकरण आणि प्रसार माध्यमे व प्रेक्षकांकडून अनेकदा तरी कौतुकाचा वर्षाव! यांचा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच मंतरलेले दिलखुलास वातावरण. ‘कर्मा’ (१९८६) च्या वेळेस तसेच होते. सुभाष घईचा हा चित्रपट मुहूर्तापासूनच चर्चेत होता. दिलीपकुमार, नूतन, नसीरुद्दीन शाह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, श्रीदेवी पूनम धिल्लॉन, अनुपम खेर… असा जबरदस्त कलाकार संच व लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत. एकूणच भव्यता स्पष्ट करणारे असेच चित्रपटाचे आगमन. आणि अशाच वातावरणात राज कपूरच्या हस्ते ‘कर्मा’च्या गीत-संगीत ध्वनिफितीचे प्रकाशन… अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील या सोहळ्यात राज कपूर व सुभाष घई यापैकी जास्त प्रभावित कोणी ठरले याचे उत्तर अनेक दिवस सापडले नाही व नंतर ते उत्तर मिळवणेही मागे पडले. चित्रपटसृष्टीतील असे सोहळे आनंदाने अनुभवायचे असतात. कारण दोन पिढ्यांचे शोमन एकत्र येण्याचे असे चंदेरी योग तसे कमीच. पण जेव्हा येतात तेव्हा ते कायमच आठवणीत राहतात ते हे असे. दिलीप कुमारच्या चित्रपटाच्या गाण्याच्या ध्वनिफितीचे राज कपूरच्या हस्ते प्रकाशन आणि हे दोघेही एकाच सोहळ्यात हा योग देखिल विशेषच…
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 1:05 am

Web Title: raj kapoor and subhash ghai
Next Stories
1 मतदान करा आणि सिनेमाच्या तिकिटावर सूट मिळवा
2 ‘द ग्रेटेस्ट शोमॅन’च्या सेटवर आग, अभिनेता ह्यू जॅकमन थोडक्यात बचावला
3 …म्हणून श्रुतीचा प्रियकर भारतात आला
Just Now!
X