News Flash

Photos : राज कपूर यांच्या नातवाचा साखरपुडा

कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. करिश्मा कपूरने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

राज कपूर यांचा नातू आणि अभिनेत्री करिना कपूर व करिश्मा कपूर यांचा आत्येभाऊ अरमान जैन याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. प्रेयसी अनिसा मल्होत्रा हिच्यासोबत छोटेखानी समारंभात हा साखरपुडा पार पडला. या समारंभाचे काही फोटो करिश्माने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अरमान जैन हा राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा मुलगा आहे. अरमान व अनिसा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून हे दोघं डेट करत आहेत. पण अरमानने प्रसारमाधमांसमोर हे नातं कधीच मान्य केलं नाही. कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत अरमानचा साखरपुडा पार पडला.

आणखी वाचा : ”तो माझ्या आयुष्यातला सर्वांत वाईट काळ”; ब्रेकअपबद्दल परिणीतीचा खुलासा 

अरमानने ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला. त्यापूर्वी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करण जोहरसोबत काम केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 4:50 pm

Web Title: raj kapoor grandson engaged girlfriend anissa malhotra watch photos ssv 92
Next Stories
1 ”तो माझ्या आयुष्यातला सर्वांत वाईट काळ”; ब्रेकअपबद्दल परिणीतीचा खुलासा
2 लक्ष्मी-नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा!
3 ‘क्रिश ४’ कधी प्रदर्शित होणार, हृतिक रोशन म्हणतो…
Just Now!
X