अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज दुपारी साडेचारच्या सुमारास जुहू येथील शिल्पा आणि राज यांच्या घरावर छापा टाकला. मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांनी वाढ करुन ती २७ जुलैपर्यंत वाढून दिल्यानंतर पोलीस कुंद्रा यांना घेऊन थेट त्यांच्या घरी दाखल झाले. या ठिकाणी शिल्पा आणि कुंद्रा यांना समोरासमोर बसवून पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…

समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता हॉटशॉर्ट अ‍ॅपबरोबरच राज कुंद्रांच्या मालकीच्या आणखीन एका वेबसाईटसंदर्भातील तपास सुरु केलाय. कुंद्रा यांच्या जेएल स्ट्रीम्स या कंपनीने सुरु केलेल्या एका वेबसाईटचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शिल्पा शेट्टीने या वेबसाईटसाठी एक जाहिरातही शूट केली होती. पाच महिन्यांपूर्वी शिल्पाने या वेबसाईटसाठी प्रमोशनल व्हिडीओ शूट केलेले. या वेबसाईटवरही अडल्ट कंटेट उपलब्ध असून ही वेबसाईट अद्यापही भारतामधून सुरु असल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळेच आता ही जाहिरात आणि या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काय संबंध आहे याबद्दल पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राज कुंद्रांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली याचिका

मुंबई जिल्हा न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडी ही कायदेशीर नसल्याचं सांगत राज कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सुनावणीविरोधात याचिका दाखल केलीय. आपल्याला बेकायदेशीपणे पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचं राज कुंद्रा यांनी याचिकेमध्ये म्हटल्याचं ‘बेंच अ‍ॅण्ड बार’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. विशेष म्हणजे आपल्याला करोना संसर्गाचं कारण देत कुंद्रा यांनी कोठडीमध्ये वाढ करण्यात येऊ नये असं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

नक्की वाचा >> राज कुंद्रांच्या पुस्तकाचं टायटल चर्चेत, पुस्तकाचं नाव आहे, “How Not To…”, लोक म्हणाली, “हा तर विरोधाभास”

आज मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केलं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आदेशाला कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे.