सोशल मीडिया सुरू झाल्यापासून प्रेक्षक आपली मते न घाबरता सोशल मीडियावर व्यक्तं करतात. बॉलीवूडमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणाने बराच जोर घेतला आहे. २० जुलै रोजी राजला मुंबई पोलीसांनी अटक केली असून काल त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अश्लील चित्रपटाचं चित्रीकरण करुन ते ‘हॉटशॉट’ अॅपवर अपलोड करणे या साठी राजला अटक झाली आहे. यानंतर सध्या बायकॉट बॉलीवूड असा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

नेटकरी ट्विट करून हिंदी चित्रपटांवर बहिष्कार टाकावा अशी मागणी करताना दिसतं आहेत. ट्विटरवर मीम्स शेअर करत बॉलीवूड मध्ये अश्लीलता आधीपासूनच आहे असं काही नेटकाऱ्यांच म्हणणे  आहे. तसंच या चित्रपटांमुळे भारतीय संस्कृतीला धोका आहे असे ही त्यांना वाटते . बॉलीवूड बरोबरच ओटीटीवर ही बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करताना दिसत आहे. एका युजरने हॅशटॅग #bollywoodstopvulgarity असं ट्विट केलं आहे.

दुसऱ्या युजरने ट्विट केले ‘बॉलीवू़डमुळे भारतीय संकृतीला धोका निर्माण होत आहे. या गोष्टीला लवकरात लवकर थांबवावे लागेल.

या पुढे अजुन एक ट्विट् करत त्या युजरने लिहले की, ‘बॉलीवूड आजवर नेहमीचं चुकीच्या गोष्टींना प्रमोट करत आले  आहे.’


राज कुंद्राला पोलिसांनी अटक केल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. या वर्षी फेब्रुवारीत मुंबई पोलिसांनी मढ इथे एका बंगल्यावर धाड टाकली होती. त्यानंतर पोलिसाना या प्रकरणा मागचा मुख्य सूत्रधार राज कुंद्रा असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे होताना दिसत आहेत.