News Flash

वीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार? ‘या’ अभिनेत्यांच्या नावांची चर्चा

या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये होणार आहे.

सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केली

लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजकेर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत तर निर्माते संदीप सिंह चित्रपटाची निर्मिती. पण या चित्रपटात कोणता अभिनेता स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही अभिनेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातील सावरकरांच्या भूमिकेसाठी अभिनेता आयुषमान खुराना, रणदीप हुड्डा आणि राजकुमार राव या तीन कलाकारांच्या नावाची चर्चा रंगली आहे. हे तीनही कलाकार त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांसाठी विशेष मेहनत घेत असल्याचे आपण पाहिले आहे.

Mahesh Manjrekar,Ayushman Khurana,Rajkumar Rao,Randeep Hooda,Vinayak Damodar Savarkar,

Video: ऐश्वर्या राय बच्चन की माधुरी दीक्षित? ‘कजरा रे’ गाण्यावर कोणाचा डान्स भन्नाट तुम्हीच ठरवा

‘सरबजीत’ या चित्रपटासाठी रणदीपने १८ किलो वजन किमी केले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते. तसेच आयुषमान आणि राजकुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे आता निर्माते कोणत्या अभिनेत्याची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandeep Singh (@officialsandipssingh)

सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केली होती. संदीप यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत “स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणे अजून बाकी आहे. वीर सावरकरांना लवकरच भेटा. एकीकडे सावरकरांचा आदर केला जातो तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटतं त्यांच्याबद्दल लोकांना फारसं माहित नसल्याने असं होतं. मात्र स्वातंत्र्य लढ्याचा ते महत्वाचा भाग होते ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे” या आशयाचे कॅप्शन दिले होते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 5:37 pm

Web Title: rajkumar rao ayushmann khurrana randeep hooda names discussed for veer savarkar biopic avb 95
Next Stories
1 रोहनप्रीतने नेहाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाला ‘मी वचन देतो की…’
2 दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी सायरा बानो यांनी दिली माहिती, म्हणाल्या…
3 VIDEO: सनी लिओनीने शेअर केला ‘हिडेन बर्थडे व्हिडीओ’; सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X