राजकुमार राव आणि पत्रलेखा सध्या बँकॉकमध्ये सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. मित्राच्या लग्नासाठी या दोघांनी थेट बँकॉक गाठलं. दोघंही सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांच्या ट्रिपचे अनेक फोटो शेअर करत आहेत. दोघांचे हे फोटो पाहून राजकुमार आणि पत्रलेखा खूप मजा करत आहेत असंच म्हणावं लागेल. नुकताच राजकुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघं जुम्मा चुम्मा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

हे दोघंही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीत राजकुमारने म्हटले होते की, दोघांनाही लग्न करायचे आहे. पण सध्या त्यांचे सारे लक्ष करिअरवर आहे. म्हणूनच लग्नाच्या बोलणी त्यांनी लांबणीवर टाकल्या आहेत. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी सिटीलाइट्स सिनेमात एकत्र काम केले होते.

यावर्षी राजकुमारच्या न्यूटन सिनेमा ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते. मात्र ऑस्करच्या अंतिम फेरीत त्याची निवड झाली नाही. यावर्षी त्याचा फन्ने खां हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.