News Flash

राजपाल यादव ‘जिलेबीवाला’च्या भूमिकेत

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता राजपाल यादव हा मराठीत पदार्पण करतोय.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता राजपाल यादव हा आगामी 'दगडाबाईची चाळ' चित्रपटात जिलेबीवाल्याच्या भूमिकेत दिसेल.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता राजपाल यादव हा मराठीत पदार्पण करतोय. आगामी ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटात जिलेबीवाल्याच्या भूमिकेत दिसेल.
जय भोले प्रॉडक्शन्स पुणे निर्मित व सुनील वाईकर दिग्दर्शित ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटाचे निर्माते दत्तात्रय भागुजी हिंगणे हे असून या चित्रपटात पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत राजपाल यादव चमकणार आहेत. ‘दगडाबाईची चाळ’ हा कौटुंबिक विनोदी चित्रपट असून याची कथा आणि पटकथा ही सुनील वाईकर यांची असून संवाद अभिजीत पेंढारकर, गीतकार नचिकेत जोग आणि संगीतकार अद्वैत पटवर्धन हे आहेत. संकलन एडविन एन्थनी तर प्रॉडक्शन प्रदीप लडकत, छायांकन चारुदत्त दुखंडे हे करणार आहेत. या चित्रपटात राजपाल यादव यांच्यासह विशाखा सुभेदार, शिवानी सुर्वे, संग्राम साळवी, भूषण कडू, सुनील गोडबोले व मोहिनी कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोदांची खिचडी असलेला ‘दगडाबाईची चाळ’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 3:17 pm

Web Title: rajpal yadav in marathi film dagdabaichi chawl
Next Stories
1 ‘दगडी चाळ’नंतर येतोय ‘दगडाबाईची चाळ’!
2 अबरामच्या ‘शूज’चे अनोखे कलेक्शन
3 स्पृहा जोशी बनणार ‘किचनची सुपरस्टार….’
Just Now!
X