News Flash

राखीच्या बोल्ड सीन देण्यावर पती म्हणतो…

राखी सावंतचा पती रितेशने पहिल्यांदाच मीडियाला मुलाखत दिली आहे

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यात आघाडीवर असलेली अभिनेत्री राखी सावंतने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. तिचे ब्राइडल लूकमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. राखीने गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र या ड्रामा क्विनच्या लग्नावर कोणाचाही विश्वास नव्हता. आता राखीने खरोखर लग्न केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राखीने रिेतेश नावाच्या एनआरआयशी लग्न केले असल्याचे सांगितले होते. मात्र त्याचा चेहरा अद्याप कोणीही पाहिलेला नाही. रितेशने नुकताच ‘स्पॉटबॉ-ई’ या बेवसाईटला मुलाखत देत लग्नाच्या चर्चांवर शिक्का मोर्तब केला आहे. रितेनशने दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीशी केलेल्या लग्नाच्या विषयावर चर्चा केली आहे. ‘राखीचे कॅमेरा समोरचे वागणे कसे ही असो मला ती मनापासून आवडते. ती एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. राखी सारखी पत्नी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. राखी ही माझ्यासाठी देवाने दिलेली एक भेट आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तिच्यासारखी महिला पाहिली नाही’ असे रितेशने सांगितले आहे.

दरम्यान रितेशला मीडियापासून दूर राहण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर रितेशने तो इतके दिवस मीडियापासून दूर का राहिला याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी मीडियासमोर का यावे? त्यातून काय साध्य होणार आहे का? उगाच नको त्या चर्चा सुरु होतील. मला माझे खाजगी आयुष्य मीडियासमोर मांडायला आवडत नाही. माझ्याबद्दल लोक काय विचार करतात त्याने मला काडीमात्र फरक पडत नाही. माझे कुटुंबीय आणि राखीचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. मी योग्य वेळ पाहून मीडियासमोर येईन. सध्या तरी माझा सर्वांसमोर येण्याचा विचार नाही’ असे रितेश म्हणाला आहे.

आणखी वाचा : रणवीरचे प्रताप पाहून दीपिका झाली नाराज

रितेशला राखीच्या बोल्ड सीन्सबद्दलही विचारण्यात होते. ‘नुकताच राखीने माझ्याशी लग्न करत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पत्नीने चित्रपटांमध्ये बोल्ड सीन द्यावेत असे कोणत्या पतीला वाटेल. पण तिच्या कपड्यांवर माझा काही आक्षेप नाही. तिला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे’ असे रितेश पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 12:26 pm

Web Title: rakhi sawant husband speaks about wife bold scene avb 95
Next Stories
1 रणवीरचे प्रताप पाहून दीपिका झाली नाराज
2 सेम टू सेम! भाऊ कदमसोबत असलेल्या ‘या’ व्यक्तीला ओळखलंत का?
3 VIDEO: ‘नक्की शेण खातंय कोण?’; राजकारण्यांवर भरत जाधव संतापला
Just Now!
X