News Flash

Video : लॉकडाउनध्ये राखी उपाशी; मासे पाहून तोंडाला सुटलं पाणी

या व्हिडीओमधील तिचा अवतार पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही.

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क मासे आणि चिकनमुळे चर्चेत आहे. होय, राखने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील तिचा अवतार पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही.

असं काय आहे या व्हिडीओमध्ये?

राखीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये मासे आणि चिकनपासून तयार केलेले विविध पदार्थ दिसत आहेत. मात्र या स्वादिष्ट पदार्थांच्या आस्वादापासून राखी वंचित आहे. हे पदार्थ पाहून तिच्या तोंडाला अक्षरश: पाणी सुटले आहे. या क्षणी राखीच्या तोंडावरचे हावभाव पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही. राखीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

यापूर्वी राखीने करोना व्हायरसबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. “करोना व्हायरस जगभरात पसरला आहे. सगळेजण तुम्हाला सांगतायत हात धुवा, पाय धुवा.. डोक धुवा.., तोंड धुवा.. सगळं धुवा पण हा आत्मा कसा धुणार? आपण खूप पापं केली आहेत. जगात सगळ्यांनी पापं केली आहेत. तु्म्हाला काय वाटतं हा करोना व्हायरस कुठून आला आहे? करोना लोकांना धडा शिकवायला आला आहे. मी सांगते तुम्ही अजूनही देवाच्या चरणी या. आपल्या पापांची माफी मागा. माझी खात्री आहे तुम्हाला करोना व्हायरस कधीही होणार नाही.” अशा आशयाची वक्तव्य राखीने या व्हिडीओमध्ये केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 1:20 pm

Web Title: rakhi sawant shares a funny video mppg 94
Next Stories
1 आर्थिक मदतीचा गाजावाजा करायचा नव्हता; तापसीचं ट्रोलर्सना उत्तर
2 Lockdown : घरात राहून उर्वशीची झाली मंजुलिका; व्हिडीओ पाहून तुम्हीही घाबराल!
3 सलमानने शेअर केला कब्रस्तानचा फोटो; पण का? जाणून घ्या कारण
Just Now!
X