News Flash

राखी सावंतचं नवं खुळ, ‘नागीन’नंतर राखीचा नवा अवतार

राखीचं हे रूप पाहिलं का?

बिग बॉसच्या 14 व्या पर्वामधून प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करणारी राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात राखीचा हात कुणीही पकडू शकतं नाही. बिग बॉस या शोमधून राखीनं धमाल करत  मनोरंजन केलं. तर शोमधून बाहेर पडल्यानंतर देखील ती सोशल मीडियावर चाहत्यांचं मनोरंजन करतेय.

सोशल मीडियावर रोज नव्या पोस्ट करत राखीचा मनोरंजन करण्याचा सिलसिला कायम सुरु आहे. सध्य़ा राखीला एक नवं खुळ लागल्याचं पाहायला मिळतंय. एका फेस एडिटींग अॅपच्या मदतीने ती सध्या वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांचं मोनरंजन करतेय. काही दिवसांपूर्वीचं राखीनं ‘नागीन’ अवतारातील एक धमाल व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर नुकताच राखीने एक नवा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने काजोल आणि प्रियांका चोप्राचं रुप धारण केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

‘माय नेम इज खान’ या सिनेमातील शाहरुख सोबतच्या एका गाण्यात  राखीचा चेहरा दिसत आहे. राखीने ‘तेरा सजदा’ हे काजोल आणि शाहरुखवर चित्रित झालेलं गाणं एडिट केलं आहे. यात तिने काजोलचा चेहरा हटवतं स्वत:चा चेहरा फिट केलाय. तर ‘गुंडे’ या सिनेमातील ‘अस्लाम ए इश्क’ हे गाणं देखील तिने एडिट केलंय. यात प्रियांका चोप्राच्या रुपात राखी ठुमके देताना दिसतेय.

या व्हिडीओच्या कॅप्शनमधून तिने चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. “तुम्हाला कोणता लूक आवडला ‘माय नेम इज खान’ मधील मंदिराचा कि ‘गुंडे’ मधील” राखीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.काही दिवसांपूर्वीच राखीने श्रीदेवी यांच्या नागीन सिनेमातील ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर डान्स करतानाचा असाच व्हिडीओ शेअर केला होता.

राखी सावंत झाली आहे ‘नागिन’, सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा

राखीने ‘बिग बॉस’च्या घरातून 14 लाख रुपये घेऊन एक्झिट घेतली होती. राखीची आई कॅन्सरशी लढा देत असल्यानं आईच्या उपचारासाठी तिला हे पैसे हवे असल्याचं तिने सांगितलं होतं. त्यानंतर शो मधून बाहेर पडताच तिने हॉस्पिटल गाठत आईची भेट घेतली. तसचं आईचा व्हिडीओ चाहत्यांसोबत तिने शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 10:29 am

Web Title: rakhi swant in kajol and priyanka chopra look shares funny video on instagram kpw 89
Next Stories
1 अटकेविरोधात कंगना सत्र न्यायालयात
2 करीश्माच्या मुलीचं “सोळावं वरीस”; “बेबो माँ”नेही दिल्या शुभेच्छा
3 तैमूरचा महाशिवरात्री विशेष लूक ठरतोय चर्चेचा विषय; अनेकजण झाले क्यूटनेसवर फिदा
Just Now!
X