08 December 2019

News Flash

Rakshabandhan 2019 : बॉलिवूडमधील बहीण- भावाच्या ‘या’ जोड्या माहितीयेत का?

रणवीरच्या सर्वात मोठ्या चाहत्यांच्या नावामध्ये अग्रस्थानी येणारं एक नाव म्हणजे रितिका भवनानी .अर्थात त्याची बहीण

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यातच आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचे भाऊ किंवा बहीण नेमके कसे असतील, हा प्रश्नही अनेकांच्याच मनात घर करुन जातो. त्यातच आता रक्षाबंधनही जवळ आलं आहे.  त्यामुळे चला तर मग यंदाच्या रक्षाबंधनच्या निमित्ताने जाणून घेऊया हिंदी कलाविश्वातील यशस्वी सेलिब्रिटीच्या भावंडांबद्दल…

१. कर्णेश शर्मा, अनुष्का शर्मा-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा मोठा भाऊ कर्णेश हा एक व्यावसायिक असून, तो ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ या निर्मिती संस्थेचा सहसंस्थापक आहे. अनुष्काच्या साथीने तो ही निर्मिती संस्था चालवत असून, आतापर्यंत या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘एनएच१०’, ‘फिल्लौरी’ आणि ‘परी’ या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.

२. अल्का भाटिया, अक्षय कुमार-

अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता अक्षय कुमारने एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या बहिणीच्या नात्याचा उलगडा केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने बहिणीसोबतच नातं कसं आहे हे सांगितलं होतं. अक्षयच्या बहिणीचं नाव अल्का भाटिया असं असून ती प्रत्येकवेळी अक्षयच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं पाहायला मिळतं.

३. रितिका भवनानी, रणवीर सिंग-
रणवीरच्या सर्वात मोठ्या चाहत्यांच्या नावामध्ये अग्रस्थानी येणारं एक नाव म्हणजे रितिका भवनानी. अर्थात त्याची बहीण. दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी रणवीर रितिकापुढे नतमस्तक होऊन तिचा आशीर्वाद घेतो. रणवीरच्या खोडकर वृत्तीमध्ये आणि त्याच्या दिलखुलास अंदाजामध्ये त्याला कुठेतरी रितिकाचीही साथ मिळते हेसुद्धा तितकच खरं.

४. सिद्धार्थ चोप्रा, प्रियांका चोप्रा-

देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा भाऊ सिद्धार्थ मात्र या विश्वापासून प्रचंड लांब आहे. सिद्धार्थने  स्वित्झर्लंडमधून हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील शिक्षण घेतलं असून, पुण्यात त्याचं स्वत:चं पबही आहे.

५. आदित्य राय, ऐश्वर्या राय बच्चन-
अभिनेत्री ऐश्वर्या रायचा मोठा भाऊ आदित्य हा इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल का रिश्ता’ या तिच्या चित्रपटाच्या निर्मितीमध्येही त्याने हातभार लावला होता.

First Published on August 10, 2019 4:13 pm

Web Title: rakshabandhan lesser known siblings of bollywood actors ssj 93
टॅग Raksha Bandhan
Just Now!
X