अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तर तिने सॉफ्ट पॉर्नस्टार असं म्हटलं होतं. कंगनाच्या या विधानावर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा संतापले आहेत. उर्मिला एक अष्टपैलू अभिनेत्री आहे, असं म्हणत त्यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – “मुलांसाठी थाळ्या सजवतात अन् आम्हाला फेकलेले तुकडे देतात”

“मला शिवीगाळ सुरु असलेल्या स्पर्धेत उतरायचं नाही. परंतु उर्मिला मांतोंडकर एक अष्टपैलू अभिनेत्री आहेत. रंगीला, सत्या, कौन, भूत, एक हसीना यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकर यांचं समर्थन केलं आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “पॉर्नस्टार शब्दाचा विरोध करणारे सनी लिओनीला आदर्श कसे मानतात?”

यापूर्वी काय म्हणाली होती कंगना?

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.