05 June 2020

News Flash

दिव्याऐवजी पेटवली सिगारेट, राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत

आपल्या चित्रपटांसोबतच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत

आपल्या चित्रपटांसोबतच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट बंद करत नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचं दर्शन घडवण्याचं आवाहन केलं होतं. मोदींनी केलल्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. सामान्य जनतेसह अनेक बॉलिवूडमधील मंडळींनीही आपल्या घराच्या गॅलरी, खिडकी, दरवाजात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. काही कलाकरांनी दिवे लावतानाचे आपले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले. पण, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने मात्र जरा वेगळाच फोटो पोस्ट केला. त्यामुळे राम गोपाल वर्माची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास राम गोपाल वर्माने सिगारेट पेटवतानाचा फोटो ट्विट केला. या फोटोसोबत त्यांनी ‘धूम्रपानाबाबत सरकारच्या धोक्याच्या सूचनांचं पालन न करण्यापेक्षा करोनाबाबतच्या धोक्याच्या सूचनांचं पालन न करणं अधिक धोकादायक आहे’, अशा आशयाचं ट्विट केलं. शिवाय सिगारेट पेटवतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला. राम गोपाल वर्माने हे ट्विट केल्यापासून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून ट्रोल करण्याचाही प्रयत्न होत आहे.

यापूर्वी एक एप्रिल रोजीही राम गोपाल वर्माने स्वतःला करोनाची लागण झाल्याचं ट्विट केलं होतं. पण, नंतर ‘डॉक्टरांनी मला एप्रिल फूल बनवलं’ असं दुसरं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यावरुनही नेटकऱ्यांनी राम गोपाल वर्मा यांना चांगलंच सुनावलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 7:43 am

Web Title: ram gopal varma lights a cigarette instead of candles during 9pm 9min initiative during coronavirus lockdown sas 89
टॅग Coronavirus
Next Stories
1 Zoom अ‍ॅपचा वापर करु नका; NASA, अ‍ॅपलसारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना
2 WHO च्या नावाने फिरत असणाऱ्या त्या मेसेजमागील सत्य काय? जाणून घ्या
3 मराठी माणसाची गोष्ट : पंतप्रधान असताना करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी बनले डॉक्टर
Just Now!
X