देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज वाढणारी संख्या भयावह आहे. यामुळे आता वैद्यकीय सेवांचा तुटवडा भासू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे, औषधांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचंही समोर येत आहे.

समाजातल्या सर्व स्तरांमधून आता सरकारवर टीका केली जात आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही आता ट्विट करत उपरोधिक शैलीत टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सर नरेंद्र मोदीजी, मी एक सभ्य हॉरर चित्रपट निर्माता आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की मला तुमच्या आगामी “तिसरी लाट” या हॉरर चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या. मी मृतदेह मोजण्याच्या विभागातही काम करु शकतो. कारण, तुमच्याइतकेच मलाही मृतदेह आवडतात पण कारणं वेगवेगळी आहे”.

त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे.

देशात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असून मृतांची संख्याही वाढत आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासांमध्ये देशात ८०हजार ९३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधितांचा आकडा आता ३३लाख ४९ हजार ६४४वर पोहोचला आहे. तर ३ लाख ७हजार ८६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात काल दिवसभरात एकूण ३,६८९ मृतांची नोंद झाली.