अभिनेता अक्षय कुमार आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘राम सेतू’ असं आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला. हा पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या चित्रपटाचं चित्रीकरण अयोध्यामध्ये केलं जावं अशी इच्छा अक्षयनं व्यक्त केली आहे. यासाठी नुकतीच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.

अवश्य पाहा – ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजितमध्ये जुंपली

योगी आदित्यनाथ यांनी अलिकडेच एका फिल्म सिटीची घोषणा केली. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत “उत्तर प्रदेशात १ हजार हेक्टरपेक्षा जास्त जागेवर जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभी करण्यात येईल,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारनं योगींची भेट घेतली अन् आपल्या आगामी चित्रपटाबाबत माहिती दिली. या दोघांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

अवश्य पाहा – अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

अवश्य पाहा – कंगनाची माघार? टीका करणाऱ्या अभिनेत्रीला ट्विटरवर केलं ब्लॉक

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले,” उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं. आशियातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवला आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.