News Flash

लाव रे तो व्हिडीओमध्ये ‘मुळशीपॅटर्न’मधील पिट्ट्याभाईची एण्ट्री

रमेश परदेशी यांचा मुलीसोबचा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वीच ‘लावरे तो व्हिडिओ’ हा नवा कार्यक्रम सुरु झाला आहे. प्रेक्षकांना, त्यांची कला सादर करण्यासाठी एक मोठा मंच ‘झी युवा’ने निर्माणकरुन दिला आहे. सर्वांचे मनोरंजन करणारे, खास विनोदी व्हिडिओ पाठवण्याची संधी उपलब्ध झाली आणि चित्रपटात काम करणाऱ्या कलाकार मंडळींना सुद्धा मोह आवरला नाही. ‘मुळशीपॅटर्न’ या सिनेमातील पिट्ट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी सुद्धा कन्येसह एक खास व्हिडिओ तयार करुन कार्यक्रमासाठी पाठवला.

‘बापसे बेटा सवाई’ असे म्हटले जाते, ते रमेश परदेशी यांच्या मुलीच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले ते या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. रमेशजी पुस्तक वाचत बसलेत आणि त्यांच्या मुलीला तिची आई दूध आणायला सांगते, असे व्हिडिओच्या सुरुवातीला दिसत आहे. यावेळी, तिला एक मुलगा फोन करून त्रास देतोय असे ती वडिलांना भासवते. हे ऐकल्यानंतर, रमेशजी स्वतःच दूध आणायला जायचं ठरवतात.

थोड्यावेळाने भाजीआणण्याच्या वेळी सुद्धा असंच काहीसं घडतं. ‘शक्कल लढवून वडिलांना खाली पाठवण्याचं कारण म्हणजे तिचा आळस आहे की अजून काही?’ हे पाहण्यासाठी कार्यक्रम पाहावा लागणार. सगळ्यांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमासाठी, व्हिडिओ पाठवण्याचा मोह रमेश परदेशी यांना सुद्धा आवरता आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 7:38 pm

Web Title: ramesh pardesi video in lav re to video avb 95
Next Stories
1 रिअ‍ॅलिटी स्टार बनण्यासाठी आला आहात का? फरहानची अभय देओलवर खोचक टीका
2 मायकल जॅक्सनला भेटण्यासाठी अनुपम खेर यांनी तोडले होते बॅरिकेट्स
3 करण जोहरची बाजू घेणाऱ्या स्वराला ‘चापलूस’ म्हणत कंगनाचा टोला
Just Now!
X